परभणी (प्रतिनिधी) परभणी विधानसभेचे महाविकास आघाडी तथा शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार आ. डॉ. राहुल पाटील यांच्या प्रचारार्थ पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभे पाठोपाठ रविवारी (दि.10) दुपारी 2 वा. गंगाखेड रोडच्या माहेर मंगल कार्यालयात भीमशक्तीचे अध्यक्ष तथा खा. चंद्रकांत हांडोरे यांची जाहीर सभा होणार आहे. या जाहीर सभेस हजारोंच्या संख्येने मतदार बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
परभणी विधानसभेचे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार आ. डॉ. राहुल पाटील यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने नुकतीच भीमशक्तीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. महाविकास आघाडीतर्फे परभणीत भीमशक्तीचे अध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हांडोरे यांची सभा रविवारी दुपारी 2 वाजता गंगाखेड रोड भागात माहेर मंगल कार्यालयामध्ये आयोजित केली आहे. 3सभेच्या तयारीच्या अनुषंगाने महाविकास आघाडी तथा आमदार डॉ.राहुल पाटील यांनी नियोजनाच्या बैठका घेतल्या. या बैठकीस राज्य उपाध्यक्ष विजयकुमार सुखदेव, राज्य सरचिटणीस रवी सोनकांबळे, महासचिव प्रा.प्रवीण कणकुटे, जिल्हाप्रमुख सतीश भिसे, तालुकाध्यक्ष राहुल कणकुटे, शहराध्यक्ष विक्रम काळे, संजय वाव्हळे, सुरेश यादव, बबन वाव्हळे, अंकुश वानखेडे उपस्थित होते.
मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
या बैठकीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन निर्मिती, समाज कल्याणच्या योजनांचे वाढविलेले बजेट तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी निर्माण केलेली हाँस्टेल सुविधेबाबत, रमाई नावाने घरकुल योजना, दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना मार्गदर्शन करण्यात आले. सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाविकास आघाडी तथा आमदार डॉ.राहुल पाटील यांच्यातर्फे करण्यात आले आहे.


