परभणी,(प्रतिनिधी) : परभणी जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेच्या (गट-क) अध्यक्षपदी संतोष किशनराव निंबरे तर प्रमुख कार्यवाहपदी अमृत विक्रम कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
वसमत रस्त्यावरील भाग्य नगरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृहात रविवारी (दि.10) सकाळी 11 वाजता परभणी जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. महासंघाचे उपाध्यक्ष तथा प्रभारी अध्यक्ष प्रमोद कदम हे अध्यक्षस्थानी होते. या बैठकीतून 2024 ते 2029 या कालावधीसाठी नवीन कार्यकारणीची एकमताने निवड करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी निंबरे, उपाध्यक्षपदी सतीश विठ्ठलराव देशमुख (हिंगोली जिल्हा), सचिन गंगाराम भालेराव, सचिन बालासाहेब घुले, प्रमुख कार्यवाह म्हणून अमृत विक्रम कदम, सहकार्यवाह दीपक सोपानराव पंढरकर, कोषाध्यक्ष राजेश गणपतराव काळे, सहकोषाध्यक्ष पठाण अजिज खान उस्मान खान, जिल्हा संघटक बाबु भाऊराव राठोड (परभणी जिल्हा), सचिन दत्तराव कांबळे (हिंगोली जिल्हा), प्रमुख मार्गदर्शक म्हणून एम.एस. बेग, कायदेशीर सल्लागार म्हणून सेवानंद जमशेटे, सिताराम काळे तर कार्यकारणी सदस्य म्हणून आर.जी. गायके, भास्कर समिंद्रे, मोहनसिंग ठाकूर, प्रमोद उर्फ राजू कदम, भारत कदम, सचिन राजाराम आरबाड, गणेश कदम, सोमनाथ रोकडे, महिला प्रतिनिधी म्हणून श्रीमती आशा रविशचंद्र दिक्षीत, श्रीमती आरती अनिलराव आरबाड, श्रीमती पद्मीणी गोपालराव पतंगे, व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून माधव गाडे, रावसाहेब कदम, विठ्ठलराव सोनवणे, वैभव पारते, गजानन गायकवाड, रामदास लांडगे, प्रशांत कुलकर्णी, संचारेश्वर कदम, राजचंद्रसेन जंगले, गजानन काळे यांची सर्वानूमते निवड करण्यात आली.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


