परभणी (प्रतिनिधी) विविध सामाजिक संघटना, मित्रमंडळ, समित्या यांची उबाठा गटाचे डॉ राहुल पाटील यांना पाठिंबा मिळत असताना शहरातील महापालिकेचे माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील सदस्य अँड. अमोल पाथरीकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उबाठा गटात नुकताच प्रवेश केला. या प्रवेश प्रसंगी अमोल पाथरीकर यांच्यासह कार्यकर्त्यांचे आ. डॉ.राहुल पाटील यांनी स्वागत केले.
शहरातील आंबेडकर नगर भागातील बुध्द विहार परिसरात झालेल्या प्रवेश प्रसंगी डॉ.विवेक नावंदर,रितेश सोळंके,गोविंद इक्कर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अमोल पाथरीकर यांच्यासमवेत निखिल डाके, संकेत गाडे, सुनील ढवळे, आस्था ढवळे, प्रवीण माने, ऋषी गायकवाड, बंटी निकाळजे, रोहिदास घनसावंत,यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला.
ग्रामीण भागात संवाद दौरा
मंगळवारी सकाळी नांदापूर, मिर्झापूर, पिंपळा, खानापूर (झरी), मांडवा, जलालपुर यासह विविध ठिकाणी डॉ राहुल पाटील यांनी भेटी देत त्यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागात यापूर्वी केलेल्या विविध कामांची माहिती देऊन आगामी काळात सुद्धा सर्व प्रकारच्या विकास करण्याचे आश्वासन आ. डॉ.राहुल पाटील यांनी दिले. दररोज शहरासह ग्रामीण भागात त्यांच्या या संवाद दौऱ्यास मतदरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.



