परभणी(प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशान्वये येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने शनिवारी (दि.14) परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सर्व प्रकारची तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, भारतीय चलनक्षम दस्तऐवज अधिनियम 1881, बॅक वसूली प्रकरणे, मोटार अपघातांची प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, भू-संपादन प्रकरणे, वीज प्रकरणे (चोरीची प्रकरणे वगळून) व पाणी आकार प्रकरणे, वेतन व भत्त्यांची सेवा विषयक प्रकरणे, महसूल प्रकरणे आणि दिवाणी स्वरूपांची इतर प्रकरणे, तसेच बँकेचे वसुली वादपूर्व दाखल प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. लोकअदालतमध्ये प्रकरणात तडजोड करण्यासाठी न्यायाधीश व वकील यांचे पॅनल मदत करणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. लोक अदालतमध्ये प्रकरण तडजोडीने मिटल्यास दाखल कोर्ट फीस नियमानुसार परत मिळते.
न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये तडजोड करण्यासाठी संबंधित विधीज्ञ पक्षकारांना सहकार्य करतील, असे परभणी जिल्हा वकील संघाचे अॅड. एम. एस. सोळंके यांनी सांगितले आहे. राष्ट्रीय लोक अदालतमध्ये जास्तीत जास्त तडजोड पात्र प्रकरणे ठेऊन तडजोडीने निकाली काढण्याचे आवाहन न्या. उज्ज्वला म. नंदेश्वर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी व आपले प्रकरण लोक अदालतीमध्ये ठेवण्यासाठी आपल्या जवळच्या न्यायालयात, अथवा तालुका विधी सेवा समिती वा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे संपर्क करावा, असे अर्चना एम. तामणे यांनी कळविले आहे.
Sunday, November 22
ताज्या बातम्या:
- खा. रामराव वडकूते यांचे नवी दिल्लीत अल्पशा आजाराने निधन
- दामपुरी येथून ५ लाखांची बोलेरो पिकअप चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
- विशेष लोकअदालतीत 32 प्रकरणे निकाली : धनादेश अनादर प्रकरणांतून 28 लाख 96 हजार 806 रुपयांची वसुली; 21 नोव्हेंबर रोजी आयोजन
- कौसडीच्या सचिन अरुण गिरी यांना पीएच.डी. पदवी प्रदान गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा
- राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताहानिमित्त उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन
- परभणीतील वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर; जिल्हाधिकाऱ्यांकडे AIYF चे सविस्तर निवेदन!
- संत तुकाराम महाविद्यालयात उद्या हभप बाळू महाराज गिरगावकर यांचे कीर्तन; स्व. अॅड. शेषरावजी भरोसे (आबा) यांच्या 17 व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजन
- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात बसच्या चाकाखाली सापडून एकाचा मृत्यू ; दुसरा जखमी


