पाथरी,(प्रतिनिधी) : पाथरी विधानसभा मतदारसंघातील 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक व दिव्यांगांकरीता निवडणूक विभागाद्वारे गृहभेटीद्वारे टपाली मतदानास सुरुवात झाली असून गुरुवारी वाघाळा येथील 102 वर्षीयभीमराव घुंबरे व 95 वर्षीय श्रीमती पदमिनबाई भिमराव घुंबरे यांनी मतदानाचा हक्क बजावला.
दिव्यांग व 85 वर्षा पुढील जेष्ठ नागरीकांचे घरोघरी जाऊन मतदान करून घेण्यासाठी 16 मतदान पथके रवाना झाली असून पाथरी विधानसभा मतदारसंघातील 528 ज्येष्ठ नागरिक व 48 दिव्यांग 48 मतदारांच्या घरी जाऊन मतदान करून घेण्याची प्रक्रिया गुरुवार, शुक्रवार व शनिवार या तीन दिवसात राबविली जाणार आहे. पहिल्या दिवशी पथकातील सदस्यांनी विविध गावांना भेटी देऊन पात्र मतदारांचे मतदान प्रक्रिया करून घेतली. वाघाळा येथील भीमराव बाळाभाऊ घुंबरे (वय 102 वर्ष) व श्रीमती पदमिनबाई भिमराव घुंबरे (वय 95 वर्ष) यांनी मतदान केले. यावेळी पथकातील पथक प्रमुख भानुदास पाटील, सूक्ष्म निवडणूक निरीक्षक खेरले, मंडळ अधिकारी शिवाजी, तलाठी सचिन साबळे, श्रीमती रंजना खिल्लारे, नरोटे, गवारे आदी उपस्थित होते.
Sunday, November 22
ताज्या बातम्या:
- खा. रामराव वडकूते यांचे नवी दिल्लीत अल्पशा आजाराने निधन
- दामपुरी येथून ५ लाखांची बोलेरो पिकअप चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
- विशेष लोकअदालतीत 32 प्रकरणे निकाली : धनादेश अनादर प्रकरणांतून 28 लाख 96 हजार 806 रुपयांची वसुली; 21 नोव्हेंबर रोजी आयोजन
- कौसडीच्या सचिन अरुण गिरी यांना पीएच.डी. पदवी प्रदान गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा
- राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताहानिमित्त उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन
- परभणीतील वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर; जिल्हाधिकाऱ्यांकडे AIYF चे सविस्तर निवेदन!
- संत तुकाराम महाविद्यालयात उद्या हभप बाळू महाराज गिरगावकर यांचे कीर्तन; स्व. अॅड. शेषरावजी भरोसे (आबा) यांच्या 17 व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजन
- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात बसच्या चाकाखाली सापडून एकाचा मृत्यू ; दुसरा जखमी


