परभणी,(प्रतिनिधी) : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मंगळवारी (दि.03) परभणी शहरातून मोठी रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकारी एस.के. भोजने यांनी दिली.
या रॅलीत सर्व दिव्यांगांच्या शाळा, कर्मशाळेतील विद्यार्थी व कर्मचारी सहभागी होणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 10 वाजता ही रॅली निघणार असून त्यास जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे हे हिरवी झेंडी दाखविणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, विसावा कॉर्नर, नारायण चाळ कॉर्नर, जिल्हा परिषद नूतन इमारत, महात्मा फुलेे पूर्णाकृती पुतळा, प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रिडा संकुल मार्गे या रॅलीचा जिल्हा क्रिडा संकुलात समारोप होणार आहे. यावेळी पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त धैर्यशिल जाधव यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


