परभणी (प्रतिनिधी) येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात, पुशुपोषण व आहारशास्त्र विभागाचे प्राध्यापक तथा विभाग प्रमुख, डॉ. सुनीत वानखेडे यांना यावर्षीचा, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथील, सन्मानाचा आणि प्रतिष्ठित असा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, नागपूर येथे प्रदान करण्यात आला.
नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे पार पडलेल्या, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये, मापसूचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांच्या हस्ते सदरील पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव मोना ठाकूर मॅडम, विद्यापीठाचे अधिष्ठता डॉ. उपाध्याय, संचालक संशोधन डॉ. कुरकुरे, संचालक विस्तार शिक्षण डॉ भिकाने, यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा डॉ. सुनीत वानखेडे, हे गेल्या 23 वर्षापासून, पशुवैद्यकीय महाविद्यालयात अध्यापनाचे, तसेच संशोधन आणि विस्तार कार्य करीत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 29 स्नातकोत्तर विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या संशोधनामध्ये, संशोधन मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय, स्तरावरील नियतकलिके मध्ये त्यांचे संशोधन पर लेख प्रसिद्ध झाले आहेत. राष्ट्रीय पातळीवरील संशोधनाच्या अनेक परिषदे, चर्चासत्र ई मध्ये त्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे.
यापूर्वी त्यांना, आऊटस्टँडिंग रिसर्च पेपर अवॉर्ड, एक्सलन्स इन टीचिंग अवार्ड, बेस्ट पीएचडी थेसिस अवॉर्ड तसेच संशोधन परिषदेमध्ये अनेक पारितोषिके प्राप्त झालेली आहेत. शेतकरी,पशुपालक आणि सुशिक्षित बेरोजगार युवक यांचे करिता आयोजित चर्चासत्रामध्ये अनेक ठिकाणी तांत्रिक मार्गदर्शन केले आहे, तसेच त्यांचे करिता विविध प्रकारच्या प्रशिक्षणाचे आयोजन त्यांनी केलेले आहे.


