पालम (प्रतिनिधी.)97 विधानसभा यशस्वीपणे पार पडल्याबद्दल महसूल विभागासह पोलीस विभागाचा पालम पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला .
पालम तालुक्यातील 91 मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी मागील 2 महिन्यापासून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जनजागृती करणे, मतदान केंद्र पाहणी, मतदान यादी प्रकाशित करणे, मतदान केंद्र सेन्सिटिव्हवर सीसीटीव्ही बसवणे , उमेदवाराचा दैनंदिन खर्चसह लेखाजोखा, प्रचार सभा पाहणी , अगदी कामासह नागरिकांचे कामकाज पाणी इत्यादी काम करण्यात प्रयत्न महसूल विभाग, निवडणूक विभाग सह महाराष्ट्र पोलीस यांनी शांतता सुव्यस्थीत ठेवत गंगाखेड विधानसभेच्या निवडणूक निर्वाचन अधिकारी व प्रशासन व पोलीस यंत्रणेने तिन्ही तालुक्यांमध्ये मतदान केंद्र दक्ष ठेवून कुठलीही अनुचित प्रकार घडला नाही व मतदानाची जन जागरण करत गंगाखेड विधानसभेमध्ये लोकसभा 63 टक्क्याहून विधानसभा 73 टक्क् टक्के वाढ झाल्यामुळे गंगाखेड उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्वाचना अधिकारी जीवराज डापकर, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर समाधान पाटील, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार कैलास चंद्र वाघमारे , निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार विनोद पवार, कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सुरेश थोरात आदींनी 97 गंगाखेड विधानसभा, अनुसूचित प्रकार कोठेही न घडता शांततामय वातावरणात विधानसभा निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे राबविल्याबद्दल पालम पत्रकारा वतीने आधीचा सत्कार करण्यात आला यावेळी शांतीलाल शर्मा लक्ष्मण गायकवाड, चॉद तांबोळी,राहुल गायकवाड,विलास चव्हाण यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी पालम तहसील मधील कर्मचारी उपस्थित होते.



