परभणी (प्रतिनिधी) परभणी रेल्वे स्थानक परिसरात सध्या अनेक गैरसोयींना प्रवाशांना सामना करावा लागत आहे आधीच बाहेर उभे असलेल्या ऑटोरिक्षा च्या विळख्यातून वाट काढत प्रवासी रेल्वे स्थानकात प्रवेश करतो तर त्याला मोकाट कुत्र्यांचा ही सामना करावा लागतो.
परभणी रेल्वे स्थानिकात कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला असून ही कुत्री प्लॅटफॉर्मवर सर्रासपणे फिरत असतात. प्रसंगी ही कुत्री आपापसात भांडण करून उच्छाद मांडतात. तर कधी प्रवाशांवर सुद्धा हल्ले करत आहेत. हे कुत्रे प्लॅटफॉर्मवर बिनधास्तपणे इकडून तिकडे तिकडून इकडे फिरत असतात या कुत्र्यांचा बंद बंदोबद करण्यात यावा अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे ( छाया- उत्तम बोरसुरीकर)


