पालम (प्रतिनिधी) परभणी येथे 10 डिसेंबर मंगळवार रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर दगडफेक करून संविधानाची प्रतिकृती तोडफोड करण्याचा दुष्कृत्त केल्याच्या निषेधार्थ 11 डिसेंबर रोजी पालम बाजारपेठ बंदचे आवाहन निवेदनाद्वारे केले आहे.
परभणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास दगडफेक करत संविधान तोडण्याच्या प्रयत्न केला अशा अपप्रवृत्ती जनक वादग्रस्त विधान व दगडफेक कृत्य करत असणाऱ्या चा निषेध करत 11 डिसेंबर रोजी पालम बंदचे आवाहन चे निवेदन पोलीस निरीक्षक यांना समस्त आंबेडकर अनुयायी च्या वतीने देण्यात आले.पालम मध्ये रॅली काढून निषेध केला.
आरोपी सोपान दतराव पवार रा मिर्झापूर ता परभणी याचेवर देश द्रोहचा गुन्हा दाखल करून फासीची शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली



