परभणी (प्रतिनिधी)दंगलीच्या नावाखाली निरपराध महिला विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेना अध्यक्ष दीपक केदार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे
ऑल इंडिया पँथर सेना अध्यक्ष दीपक केदार यांनी परभणी शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळापरिसराची पाहणी करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. दंगलीच्या नावाखाली निरपराध महिला विद्यार्थ्यां वरील गुन्हे मागे घ्यावे, चौकशी न करता दाखल केलेले चुकीचे तिन्ही एफआर रद्द करावेत, संविधान प्रतिकृतीचा अवमान करणाऱ्या मास्टरमाईंडला अटक करा, मागासवर्गीय वस्तीमधील कोंबिंग ऑपरेशन थांबवावी, यासह विविध मागण्या केल्या आहेत. ( छाया संजय घनसावंत)


