परभणी, (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य (सचिव दर्जा) ॲड. धर्मपाल मेश्राम हे दि. 17 आणि 18 डिसेंबर 2024 रोजी दोन दिवसीय परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
मंगळवार दि. 17 रोजी दुपारी 4.00 वाजता परभणी येथे आगमन व मुक्काम. बुधवार दि. 18 रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, समाजकल्याण सहायक आयुक्त यांचेसोबत घटनास्थळी भेट. दुपारी 12.00 वाजता जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि समाजकल्याण सहायक आयुक्त यांचे सोबत सर्किट हाऊस येथे बैठक. दुपारी 1 ते 2 पर्यंत राखीव. दुपारी 2.00 वाजता परभणी येथून शासकीय वाहनाने नागपूरकडे ते प्रयाण करतील.
*-*-*-*-*


