पालम बसस्थानका साठीपरिवहन मंत्री यांची घेतली भेट
पालम (प्रतिनिधी) मागील अनेक दशकापासून पालमच्या बसस्थानकाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली आहे. हा प्रश्न मार्गी लावू अशी वाही गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी दिली आहे.
पालम हे तालुक्याचे ठिकाण असून मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणाहून पुणे, बीड, परळी लातुर, नांदेड, परभणी आदी ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड संख्या आहे. गंगाखेड ते लोहा राष्ट्रीय मार्ग असल्याने या मार्गावर पालम तालुक्यातुन प्रवासी मोठया संख्येने प्रवास करत असतात. पण पालम शहरात येनाऱ्यां जानाऱ्यां प्रवाशांना थांबण्यासाठी अजूनही बस स्थानकाचे निर्माण झालेले नाही. त्यामुळे प्रवाशांना राष्ट्रीय मार्गाच्या कडेलगत उभे टाकून तासन तास बसची प्रतीक्षा करावी लागते. पावसाळ्यात पावसाचा तर उन्हाळ्यात उन्हाचा मारा झेलत प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

तेव्हा पालमराकडून हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी वारंवार होत असते. पण शहरात सरकारी जागा उपलब्ध नसल्याने आणि खाजगी जागांची भाव गगनाला भिडल्याने बस स्थानकासाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे हा प्रश्न तसाच धुळखात पडलेला आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी शहरात बसस्थानक असणे अतिशय गरजेचे आहे. हीच अडचण पाहुन गंगाखेडचे आ डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी हा प्रन्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन बस स्थानकाची परिस्थिती बाबत त्यांच्याशी सविस्तर
चर्चा केलेली आहे. याचबरोबर बसस्थानक साठी लागणारी जागा कशा पद्धतीने घेता येईल याकरिता माहिती दिली आहे. त्यामुळे बसताना हक्काचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत मिळणार आहे. पालमच्या बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांचे सर्व थरातुन अभिनंदन होत आहे


