परभणी,(प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी पाथरी विधानसभा मतदारसंघाचे पाथरी मतदारसंघाचे आ. राजेश विटेकर यांची पक्षश्रेष्ठींद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या स्वाक्षरीने व पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्याहस्ते मंगळवार 28 जानेवारी रोजी आ. विटेकर यांना हे नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे परभणी शहर जिल्हाध्यक्ष तथा परभणीचे प्रथम महापौर प्रताप देशमुख यांची उपस्थिती होती. या नियुक्तीबद्द आमदार विटेकर यांचे अभिनंदन होत आहे.
दरम्यान, पक्षाने वेळोवेळी दिलेल्या संधीमुळेच आपणास इथपर्यंतचा प्रवास करता आला. परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासह पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू, असा विश्वास आ. विटेकर यांनी व्यक्त करीत पक्षाचे अध्यक्ष पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष तटकरे यांचे आभार व्यक्त केले.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


