पालम (प्रतिनिधी) येथील महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय व कृष्णाई पब्लिक स्कूलमध्ये आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन आणि भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या वेळी गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी उपस्थित राहून सर्वांशी संवाद साधला. तसेच शाळेतील मुलांचे कलागुण व कौशल्यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे औचित्य साधून सलग दोनवेळा विजयी झाल्याबद्दल आमदार डॉ रत्नाकर गुट्टे आणि आमदार राजेश दादा विटेकर यांचा शाळेच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गुहे यांनी मनोगत व्यक्त करून शाळा प्रशासनाचे आभार मानले. तसेच विद्यार्थी व पालकांना सविस्तर मार्गदर्शन केले.
ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणात अनेक अडचणी येतात.पण विध्याथ्यानी प्रयत्न कधीही सोडू नका. हे स्पर्धेचे युग आहे.येथे टिकण्यासाठी खूप संघर्ष करावे लागते आणि त्यात जो पाय घट्ट रोवून उभा राहतो तो जिंकतोच. म्हणून आयुष्यात मोठे होण्यासाठी खूप परिश्रम करा. मेहनत करा. कष्टानेच कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येते. त्यामुळे आपली स्वप्ने साकार करण्यासाठी मनाशी जिद्द बाळगा. आपल्या आई-वडिलांना आणि गुरुजनांना कधीही विसरू नका. अभ्यास करा आणि यशस्वी व्हा, असाही कानमंत्र आ. गुट्टे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. यावेळी आमदार राजेश दादा विटेकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गणेशराव रोकडे, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, मित्रमंडळाचे विधानसभा अध्यक्ष किशनरावजी भोसले,मा जिल्हा परिषद सदस्य रत्नाकरजी शिंदे,पोलीस निरीक्षक सुरेशजी थोरात, मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष संदीपजी आळनुरे, प्रभारी माधवराव गायकवाड, बालासाहेब रोकडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन रोकडे, नगरसेवक उबेद खान, माजी सभापती गणेशराव घोरपडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश हत्तीअंबीरे, अतुल धुळगुंडे, विजय घोरपडे, माऊली घोरपडे, यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


