परभणी (प्रतिनिधी) दिव्यांग बांधवांची अनेक महिन्यापासून मागणी होती दिव्यांग परिवारांना अंत्योदय कार्ड मिळावे यासाठी सत्यम दिव्यांग संघटनेच्या वतीने अनेक महिन्यापासून जिल्हाधिकारी यांच्याकडे संघटनेच्या वतीने वेळोवेळी मागणी करत होते जिल्हाधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेऊन तहसीलदार परभणी यांना दिव्यांगांना तात्काळ अंत्योदय राशन कार्ड देण्यात यावे अशा सूचना केल्या होत्या
आज दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी तहसील कार्यालयामध्ये 20 दिव्यांग कुटुंबांना जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांच्या हस्ते कार्डाचे वाटप करण्यात आले समवेत तहसीलदार संदीप राजपुरे , ना तहसीलदार अनिकेत पालेपवाड. सत्यम दिव्यांग संघटनेचे संजय वाघमारे यांच्यासह सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती होती


