पालम (प्रतिनिधी) तालुक्यातील शेखराजुर शिवारात पारवा रोडच्या बाजुला एका अनोळखी इसमाचा मृतदेह दिनांक १० फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास आढळून आला. मयताची ओळख पटलेली नाही.
शेखराजुर शिवारातील प्रसाद माधवराव कोंडापुरे यांच्या शेताजवळ एका अनोळखीचा मृतदेह पडला असल्याची माहिती पालम पोलिस स्टेशन येथे कळताच तातडीने घटनास्थळी पो.नि. सुरेश थोरात यांनी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेत पालम ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. सदर इसमाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे याचा शोध घेतला जात आहे. मयताजवळ त्याची ओळख पटेल असे कोणतेही साहित्य मिळून आले नाही. सदर इसमाला कोणी ओळखत असेल तर पालम पोलिसांशी संपर्क साधुन माहिती द्यावी असे आवाहन पो.नि. सुरेश थोरात यांनी केले आहे.
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


