परभणी (प्रतिनिधी) आ डॉ.राहुल पाटील यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त दिनांक 18 फेब्रुवारी रोजी धर्मवीर,धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट मोफत दाखवण्यात येणार आहे. अनुसया टॉकीज येथे महिलांसाठी व पुरुषांसाठी दोन शोचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांसाठी दुपारी 3 वाजता तर पुरुषांसाठी सायंकाळी 6 वाजता हे शो दाखवण्यात येणार आहेत.
स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे हे आपल्या 9 वर्षाच्या कारकीर्दीत 125 यशस्वी लढाया लढले, या काळात ते एक कुटुंबप्रमुख म्हणून, पती म्हणून, पिता म्हणून, मुलगा म्हणून, राजा म्हणून कसे होते? यावर आधारित छावा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, संभाजी महाराजांचं चरित्र हे खूप प्रेरणादायी आहे.औरंगजेबाने संभाजी महाराजांचे कैदेत असताना खूप हाल केले. पण संभाजी महाराज शेवटपर्यंत झुकले नाहीत. आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी त्यांनी बलिदान दिले त्यांच्या बलिदानाची, त्यागाची माहिती व्हावी यासाठी हा चित्रपट तयार करण्यात आला आहे,हा चित्रपट सर्वांना पाहता यावा यासाठी परभणीचे शिवसेना ठाकरे गटाचे आ. डॉ. राहुल पाटील यांनी पुढाकार घेतला असून अनुसया ई-स्क्वेअर येथे दिनांक 18 फेब्रुवारी मोफत शोचे आयोजन करण्यात आले आहे.
हा चित्रपट पाहण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आ. डॉ.राहुल पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.