पालम (प्रतिनिधी) तालुक्यातील पेठशिवणी येथिल रहिवासी निळकंठ शिवाजीराव चेटले एम पी एस सी च्या परीक्षेत यश संपादन करत थेट दुसऱ्यांदा वर्ग १ उपशिक्षणाधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले आहे. निळकंठ चेटले हे मूळ पेठशिवणी येथिल रहेवाशी असून त्यांचे इयत्ता सातवी पर्यंत चे शिक्षण जिल्हा परिषद शाळा पेठशिवणी व माध्यमिक शिक्षण ममता विद्यालय पालम येथे झाले. वयच्या ४ वर्षचे असताना वडिलांचे छत्र हरवले असता आईच्या अथक प्रयत्नाने यशाच्या शिखरावर पोहोचला आहे.
निळकंठ चेटल यांनी पदवीचे शिक्षण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथून बी ए पदवीधर झाले. व त्यांचा पुढील प्रवास २०१७ पासून राज्यसेवा पूर्व परीक्षा पासून सुरू झाला. आज पर्यंत तब्बल चार वेळेस पूर्व मुख्य व मुलाखती देऊन २०२१ मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा घेण्यात आली यावेळेस असंख्य प्रयत्नात ८३ वी ओबीसी प्रवर्गात २३ वी रँक प्राप्त करून असिस्टंट कमिशनर (जी एस टी) अधिकारी पद ३ ऑक्टोबर २०२३ रोजी मिळवले व त्याचबरोबर त्यांनी २०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली आणि ३ ऑक्टोबर २०२३ रोजी वस्तू व सेवा कर विभागात आयुक्त या पदावर मागील दीड वर्षापासून कार्यरत होते यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी यशदा पुणे प्रशिक्षणासाठी रुजू झाले. व ते तेवढ्यावरच न थांबता त्यांचे स्वप्न शिक्षण क्षेत्रामध्ये असल्यामुळे त्यांचे त्यामध्ये मन रमत नव्हते.व त्यांना शिक्षणाचा ध्यास व सामाजिक कार्याचे आवड होती आणि त्यांनी शिक्षण विभागामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला व त्यांचे स्वप्न दिनांक २१फेब्रुवारी २०२५ रोजी पूर्ण झाले मागे २०२२ मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ चा निकाल जाहीर झाला व त्यामध्ये पेठशिवणी चा निळकंठ चेटले परत एकदा वर्ग १ चा उपशिक्षण अधिकारी म्हणून निकाल आला. सदरील नियुक्ती आदेशानुसार ते दिनांक २ एप्रिल रोजी शालेय शिक्षण विभागात संबंधित पदाचा पदभार स्वीकारतील व त्यांचे जे स्वप्न होते ते साकार झाले. पेठ शिवणी व परिसरातील सर्वत्र त्याचे कौतुक करण्यात येत आहे व त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांचा सत्कार करण्यात आला.


