पालम ( प्रतिनिधी ) दिनांक 25 रोजी कन्या शाळेच्या प्रागनात पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व कन्या शाळेच्या मुलांची आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते
यावेळी उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष रामराव रोकडे हे होते। शिबिरा ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधिकारी, तज्ञ डॉ.विनायक वाखरडकर, डॉ. महाबळेश्वर, डॉ.दवणे, डॉ. वडजे, डॉ चव्हाण मॅडम यांच्या उपस्थितीत या वेळी मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी केंद्रप्रमुख येरगलवाड, शाळेचे मुख्याध्यापक मुंडकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश मालेवार,नागरिक, विद्यार्थी व सर्व शिक्षक या आरोग्य शिबिरास उपस्थित होते.



