पालम ( प्रतिनिधी)पालम तालुका भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 134 वी सार्वजनिक जयंती उत्सव आयोजनासाठी बौद्ध विहार पालम येथे बैठकीचे आयोजन करण्यात येऊन सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते गणेश विठ्ठलराव हत्तीआंबीरे, उपाध्यक्ष महिंद्रापाल देविदास हनवते, सचिवपदी सूर्यकांत सखाराम रायबोले, कार्याध्यक्ष अरविंद शेषराव थिटे, सहकार्य अध्यक्ष अजयराजे अंबादास हनवते, कोषाध्यक्ष सिद्धार्थ रामराव वावळे, संघटक आकाश सखाराम हत्तीअंबिरे, सहसचिव जयपाल सोमनाथ गाडे, सहकोश अध्यक्ष कमलाकर संभाजी वायवळ, सहसंघटक मंगेश भीमराव जोंधळे, स्वागत अध्यक्ष जालिंदर सोनाजी हत्तीआंबिरे, गौतम गोपाळराव हत्तीअंबिरे, संजय रामराव थिटे, निवृत्ती संभाजी हत्तीआंबिरे,वैजनाथ शंकरराव हत्तीआंबिरे, मधुकर मारुती हनवते, ऍड. राहुलकुमार हत्तीआंबिरे, सल्लागार सखाराम हत्तीअंबिरे, शेषराव थिटे, भुजंग
हत्तीअंबिरे, रोहिदास हनवते, गणपतराव हत्तीअंबिरे ज्ञानोबा हनवते, नवनाथ हत्तीअंबिरे,दिलीप
हत्तीअंबिरे,महेंद्र कुमार रोहिणकर, माधव हनवते, संजय शेळके, संजय वावळे, बापूसाहेब हनवते, काशिनाथ थिटे,शंकर गायकवाड,व प्रसिघ्दी प्रमुख शांतीलाल शर्मा,मारूती नाईकवाडे,बालासाहेब फुलपगार,धोंडीराम कळंबे,शिवाजी शिंदे,चॉद तांबोळी,गोविंद सोलेवाड, सग्राम खेडकर,यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांची सार्वजनिक जयंती साजरी करण्यात येणार असून यानिमित्ताने दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी
सायंकाळी सात वाजता महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन तसेच सायंकाळी रविराज भद्रे व आम्रपाली खराटे यांच्या भीम गीत गायनाचा दणदणीत कार्यक्रम होईल.
दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 07:00 वाजता महाराष्ट्राच्या महागायीका मीराताई उमप यांचा आंबेडकरी जलसा कार्यक्रम होणार असून दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9:00 वाजता मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण संपन्न होईल तसेच दुपारी 2:00 वाजता पालम शहरातील मुख्य रस्त्यावरून महापुरुषांच्या प्रतिमेचे भव्य मिरवणूक निघून सायंकाळी 7:00 वाजता बौद्ध वंदनाने विसर्जन होईल.
07:30 पंकज भारती औरंगाबाद{ संभाजीनगर } त्यांची व्याख्यान यानंतर 08:30 वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक कुंभारा परी भीमा समाजाला घडविले फेम प्रकाशदीप वानखेडे व महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका आशा ताई चरवे यांच्या भीम गीत गायनांचा दणदणीत सामना होईल…
तरी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमास सर्व सन्माननीय
तालुक्यातील नागरिक तसेच बौद्ध उपासक व उपासीका यांनी उपस्थित राहण्याच्या आवाहन जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश हत्तीअंबिरे व सार्वजनिक जयंती उत्सव समिती च्या वतीने करण्यात आले