पालम(प्रतिनिधी)कर आकारणीच्या निषेधार्थ परभणी जिल्हयातील बीआर बार व परमीट रुम 20 मार्चला बंद रहानार आहे. हॉटेल असोसिएशनचा सरसकट दहा टक्के व्हॅट आकारणीला विरोध परभणी महाराष्ट्रातील मद्य विक्रेते 20 मार्च रोजी आपले बीआर बार बंद करून सरकारकडून होत असलेल्या कर वाढीच्या निषेधार्थ आपला निषेध व्यक्त करणार आहेत.
महाराष्ट्रातील परमिट धारकांच्या मद्यविक्री वर सरकार कडून सरसकट दहा टक्के अतिरिक्त व्हॅट आकारला जात आहे. हा व्हॅट थेट मद्य उत्पादकांवर आकारला जावा, जेणेकरून शासनाचे उत्पन्न वाढेल, या कर आकारणी निषेधार्थ २० मार्च 2025 रोजी परभणी जिल्ह्यातील सर्व परमिट रूम व बार बंद राहणार आहेत.तसे ग्रामीण व शहरी भागामध्ये हातगाडे, धाबे, हॉटेल्स येथे अनाधिकृत पणे मद्यविक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यांच्यावर दारुबंदी विभागाकडून किंवा पोलिसांकडून कारवाई होतांना दिसत नाही कधीतरी थातूर मातुर कार्यवाही केलीजाते व अत्यंत कमी दंडात्मक कारवाई असल्यामुळे हे अनधिकृत व्यवसाय दिवसेन दिवस वाढत चालले आहेत. तर काही जण चक्क वाईन शॉप वरून दारू घेवून रस्त्याच्या बाजुला झाडाखाली किंवा एखादा शेतामध्ये निवांत पितांनाचे चित्र अनेक्दा दिसू लागले आहे. यावर शासनाकडून कोणतेही कडक कारवाई होताना दिसत नाही.
शासना कडून जानुन बुजून डोळे झाक करण्यात येत आहे.
परमीट रूम व्यावसायिक शासनाचा महसूल भरून व्यवसाय करीत आहेत. सरकारने उत्पादक, वितरक, किरकोळ परमीट रूमधारक या सर्वांना सारखीच कर प्रणाली जर लागू केली तर सरकारचा महसूल वाढू शकेल. वाइन शॉप यांना व्हॅट न आकारता सर्व कर उत्पादकांकडून वसूल करावा, जेणेकरून परमीट रूमधारकांनाही योग्य दराने मद्य विक्री करता येईल. यावेळी राजूशेट लांडेग हॉटेल जे.के. दिपक शेट गौड हॉटेल दिपक, प्रशांतराव कातकडे हॉटेल आर.के.भरत केद्रे मयुरी बार झंटीग पाटील. निवांत बार अजय सिरस्कर, अपेक्षा बार बाळासाहेब क्षिरसागर, वरदआशिष विजय चव्हाण सह आदी उपस्थित होते.
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


