परभणी,(प्रतिनिधी) : महिलांच्या खर्या अर्थाने सशक्तीकरणासाठी ठोस धोरणे आवश्यक असल्याचे मत खासदार डॉ. श्रीमती फौजिया खान यांनी राज्यसभेत व्यक्त केले.
केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या कार्यपध्दतीवर कठोर टीका करतेवेळी श्रीमती खान यांनी महिलांच्या सक्षमीकरणाच्या केवळ घोषणाबाजीवरच सरकार भर देत आहे. प्रत्यक्षात महिलांचे आरोग्य आणि पोषणाच्या बाबतीत मूलभूत सुधारणा होत नाहीत, अशी खंत व्यक्त केली. मातृ मृत्यू दराची स्थिती भयावह आहे. सध्या भारतात एमएमआरचा दर 97 प्रति 1 लाख जिवंत जन्म आहे. जो यु.एन.ने निश्चित केलेल्या 70च्या टार्गेटपेक्षा जास्त आहे. आसाम, मध्यप्रदेश या ठिकाणची स्थिती तर आणखीन गंभीर आहे. जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमातसुध्दा अनेक त्रुटी आहेत. विशेषतः वाहने अपुरी आहेत. त्यामुळे अनेक गर्भवतील महिलांना धोके निर्माण होत आहेत. खाजगी रुग्णालयांमधून अनावश्यक सिझेरियन शस्त्रक्रियेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यावर कठोर नियंत्रण आवश्यक असून आरोग्य सेवांसाठी भरघोस निधीची गरज आहे. सद्यस्थितीत एच.पी.व्ही. लसीकरणाबाबतही चिंताजनक स्थिती आहे. ही लस गरोदर महिला व मुलींना सर्वसामान्यपणे मिळावी यासाठी अद्याप सरकारने कोणताही ठोस निधी मंजूर केलेला नाही. पोषणाच्या बाबतीतसुध्दा आनंदी आनंद आहे. त्यामुळे जीडीपीच्या 2.5 टक्के निधी आरोग्यासाठी मंजूर करावा, आरोग्य सेवांसाठी पायाभूत सुविधा मजबुत कराव्यात, गर्भवती महिलांसाठी प्रसवपूर्व व प्रसोत्तर सेवांचा विस्तार करावा, डॉक्टर आणि परिचारिका यांची संख्या वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
Friday, July 18
ताज्या बातम्या:
- निवडणूक कालावधीत उत्कृष्ट वार्तांकन केलेल्या पत्रकारांचा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते सन्मान
- कृषि पंप योजनेवरुन सरकारला धरले धारेवर ; आ.डॉ.राहुल पाटील विधानसभेत आक्रमक-लक्षवेधीद्वारे वीज समस्यांकडे वेधले सरकारचे लक्ष
- संबर येथील अपहरण आणि खून प्रकरणातील पाच आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हा शाखा व परभणी ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई
- उद्यापासूनच जिल्ह्यातील कॅनॉल व माजलगाव धरणात पाणी सुटणार; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची बैठकीत माहिती
- पालकाच्या मृत्यूप्रकरणात निवेदन सादर करा; आ.डॉ राहुल पाटील यांच्या प्रश्नावर विधानसभा अध्यक्षांच्या सूचना
- भाजपा जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांचा मदतीचा हात; ह.भ.प. जगन्नाथ महाराज हेंडगे मृत्यू प्रकरणातील पीडित कुटुंबास दोन लाखांची आर्थिक मदत
- जायकवाडी डाव्या कालव्या मार्फत शेतीसाठी पाणी सोडावे युवक काँग्रेसची मागणी
- आ राजेश विटेकर यांनी विधान सभेत उपस्थित केलेल्या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन वर कार्यवाही