परभणी (प्रतिनिधी) जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने मुस्लिम पत्रकार बांधवांसाठी इफ्तार पाटीर्चे आयोजन दि. १९ मार्च 2025 रोजी येथील स्टेडियम परिसरातील अतिथी हॉटेल मध्ये करण्यात आले होते. सदरील इफ्तार पाटीर्साठी पोलीस उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी हजेरी लावली. त्याच प्रमाणे मोठया संख्येने पत्रकार संघाचे पदाधिकारी व शहरातील मुस्लीम नागरिक उपस्थित होते.
मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असून यावर्षी कडक उन्हाळ्यामध्ये 2 मार्चपासून रमजान महिन्याची सुरुवात झाली आहे 30 दिवस संपूर्ण महिनाभर मुस्लिम धर्मीय रोजा उपवास राहून या महिन्यांमध्ये विविध धार्मिक विधी व नमाज पठण करून अल्लाची पूर्ण श्रद्धेने आराधना करतात.पहाटे पाच वाजता जेवण (सहेर)करून उपवासाची सुरुवात होते दिवसभर अन्नाचे एक कण किंवा पाण्याचा एक घोट सुद्धा रोजा दरम्यान घेतल्या जात नाही सायंकाळी 6.40 वाजता उपवास (इफ्तार) खजूर खाऊन रोजा सोडल्या जातो रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये उपवासाला फार महत्त्व दिले जाते. इफ्तार पार्टीमध्ये मौलाना जहीर अब्बास यांनी दुवा केल्यानंतर सगळ्यांनी उपवास सोडला.
या इफ्तार पार्टीमध्ये उपविभागीय दंडाधिकारी दत्तू शेवाळे यांनी मोलाचे मार्गदर्शन करत सांगीतले की अशा प्रकारे हिंदु-मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेले कार्यक्रम घेण्याची नितांत गरज आहे. मराठी पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात आलेला हा कार्यक्रम स्तुत्य उपक्रम असून या पुढेही ही परंपरा कायम राखावी असे प्रतिपादन केले.
परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके,मराठी पत्रकार परिषदचे सरचिटणीस सुरेश नाईकवाडे,कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर, कोषाध्यक्ष मोईन खान, डिजीटल मिडीया जिल्हाध्यक्ष शेख इफ्तेखार,महानगर जिल्हाध्यक्ष शिवशंकर सोनुने,प्रसिध्दी प्रमुख सुधाकर श्रीखंडे,जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल वडकुते,डिजीटल महानगर जिल्हाध्यक्ष राहुल वायवळ, ज्येष्ठ पत्रकार मदन कोल्हे,मोहसीन खान, नजीर खान,फहीम काजी,जकीयोद्दीन खतीब,बशीर अहेमद,सय्यद अय्युब, सय्यद अखील,अतीखुररहेमान,सुहास पंडीत आदी उपस्थित होते..