परभणी (प्रतिनिधी) महाराष्ट्र विधान मंडळाच्या OBC समितीवर विधानमंडळाने आ राजेश विटेकर यांची नियुक्ती केली आहे
इतर मागासवर्गीय कल्याण समिती हि इतर मागासवर्गीय (OBC) समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी उपाययोजना करणे आणि त्या अंमलात आणण्यासाठी शिफारसी करते तसेच राज्य सरकारद्वारे OBC समाजासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा आढावा घेणे, योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासनाला सूचना देणे. OBC विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, वसतिगृह सुविधा, शैक्षणिक कर्जे यांची उपलब्धता आणि अंमलबजावणी तपासणे. शैक्षणिक संस्थांमध्ये OBC विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सवलती आणि त्यांच्या प्रवेशासंबंधी अडचणी सोडवणे.
अशा महत्त्वाच्या बाबीसह OBC समाजासाठी आर्थिक विकास प्रकल्प, स्वयंरोजगार योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण यासंबंधी शिफारसी करणे. उद्योग, व्यवसाय आणि शेतीपूरक उपक्रमांसाठी पतपुरवठा आणि अनुदान योजनांचा आढावा घेणे. सरकारी आणि खासगी क्षेत्रातील रोजगारामध्ये OBC समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाची अंमलबजावणी होते की नाही, याची पाहणी करणे. अश्या उमेदवारांसाठी रोजगार मेळावे आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सूचना देणे. सरकारच्या विविध विभागांकडून OBC समाजाच्या कल्याणासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांवरील प्रगती अहवाल मागवणे. गरज असल्यास योजनांमध्ये सुधारणा सुचवणे. समस्यांचे निराकरण OBC समाजासमोरील समस्यांची माहिती संकलित करणे आणि त्या सोडवण्यासाठी शिफारसी करणे. तक्रारींची दखल घेऊन संबंधित विभागांना कार्यवाहीसाठी निर्देश देणे. इतर मागासवर्गीय कल्याण समिती OBC समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी प्रभावी भूमिका बजावते. शासनाला धोरणात्मक मार्गदर्शन देऊन समता आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यास मदत करते. या समितीच्या शिफारसींमुळे OBC समाजाला मूलभूत सुविधा आणि संधी मिळण्यास हातभार लागतो. या समिती सोबतच विधानभवनाच्या ग्रंथालय समिती वरही आ राजेश विटेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे