पालम (प्रतिनिधी) सोमवारी 7 एप्रिल रोजी परभणी जिल्हयात अचानकपणे आलेल्या वादळ, वारे व अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या बाधित क्षेत्रांचे पंचनामे करुन त्वरीत नुकसान भरपाई देणे बाबत..पालम तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले,
परभणी जिल्हयात बऱ्याच सर्वदूर भागात अचानकपणे आलेल्या वादळ, वारे व अवकाळी पाऊस काही प्रमाणात गारपीट यामुळे जिल्हयातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे गहू, ज्वारी, करडई, फळबागा ईत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने व अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्यांचे त्वरीत पंचनामे करुन जिल्हयातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन मदत करावी. अशी मागणी किसान एकता महासंघाच्या वतीने पालम तहसीलदार साहेब यांच्याकडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे
या निवेदनावर तालुका अध्यक्ष प्रसाद पौळ, कृषी मित्र काझी अकबर खा पठाण, दत्तराव देशमुख, गणेशराव पौळ विष्णू पौळ, व्यंकटी मोरताटे शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.