परभणी (प्रतिनिधी) येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात महाराष्ट्र शासन व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या आदेशान्वे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे प्राचार्य डॉ.शेख बाबर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.या सप्ताहाच्या माध्यमातून जय भीम पदयात्रा, संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आणि कार्यावर वक्तृत्व स्पर्धा, समतादूताच्या माध्यमातून मार्गदर्शन, महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन आणि भीम जयंतीच्या दिनी बाबासाहेबांना अभिवादन करून समारोप होणार आहे.
उद्घाटनाच्या प्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र.कुलगुरु डॉ.अशोक महाजन, प्राचार्य बी. यू.जाधव, विद्यापीठाच्या प्राधिकरणातील डॉ. चौधरी, अशोक गुजराती यांनी भेट दिली.या कार्यक्रमाला उपप्राचार्य विजय घोडके,डॉ.पी.एस.वक्ते, सर्व विभागाचे विभाग प्रमुख आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा.डॉ. भीमराव खाडे यांनी तर आभार डॉ.पिसे सरांनी मांडले.