परभणी (प्रतिनिधी)येथील ज्ञानोपासक महाविद्यालय आणि रसायनशास्त्र विभागाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूसाहेब ऍड. गणेशरावजी दुधगावकर होते,बोलताना ते म्हणाले जातीयता नष्ट झाल्याशिवाय सामाजिक समता प्रस्थापित होणार नाही हे बाबासाहेबांना माहीत होतं त्यामुळे सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिल.
महाराष्ट्र शासन व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या आदेशान्वे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह आयोजित करण्यात आला होता.या सप्ताहात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर मार्गदर्शन,जय भीम पदयात्रा, महात्मा फुले यांना अभिवादन, समतादुताच्या माध्यमातून विविध शिष्यवृत्ती योजनेचे मार्गदर्शन आणि बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन अशा अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलें होते.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेख मोहम्मद बाबर यांना त्यांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कार्याबद्दल ज्ञानोपासक डॉक्टर बी.आर. आंबेडकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्राचार्य डॉ.शेख मोहम्मद बाबर, उपप्राचार्य प्रा. विजय घोडके, हाश्मी साहेब यांनी मनोगत व्यक्त केले आणि सर्वांना भीम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा.डॉ.भीमराव खाडे यांनी तर आभार प्रा.डॉ. एस.डी. पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन डॉ.खाडे, डॉ.पिसे,डॉ.पाटील, डॉ.लोढे, प्रा.नालटे,डॉ.मनवर, डॉ. गायकवाड, डॉ.भुसारे प्रा.लीपने प्रा.फैजन प्रा.अगरमोरे प्रा.कदम,सामाले, शेख उबेद यांनी केले होते.
या कार्यक्रमाला सर्व विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.