पालम (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती शहरातील विविध ठिकाणी साजरी करण्यात आली.
बौद्ध विहार पालम येथे यावेळी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण पालम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय सुरेश थोरात, यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालम नगरपंचायत चे नगराध्यक्ष वसंत काका सिरस्कर यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमास पालम सभापती गजानन गणेशराव रोकडे, नगरसेवक लक्ष्मण रोकडे,
उपनगराध्यक्ष इमदाद खान पठाण, कृषी अधिकारी आबासाहेब देशमुख, सुभाषराव धूळगुंडे, गटनेते भास्करराव सिरस्कर, रामजी मणियार, नगरसेवक सय्यद इखार भाई, अकबर खान, पठाण, हबीब चाऊस, प्रा. गुडदे सर, पत्रकार शांतीलाल शर्मा, गौस शेख, चांद तांबोळी इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी वसंत काका सिरस्कर,पोलीस निरीक्षक सुरेस थोरात साहेब,प्रा गुडधे, रामजी मणियार, कृषी अधिकारी आबासाहेब देशमुख, माऊली घोरपडे, आदी मान्यवरांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले यावेळी लहान लहान बालकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त केले. जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे व उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड.राहुल हत्तींआंबीरे, तर आभार प्रदर्शन सूर्यकांत रायपुरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष गणेश हत्तीआंबिरे, उपाध्यक्ष महेंद्रपाल हनवते, सचिव, सूर्यकांत रायबोले, कार्याध्यक्ष अरविंद थिटे, कोषाध्यक्ष सिद्धार्थ वावळे,
आधी जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


