सेलू. (प्रतिनिधी) जालना-नांदेड समृद्धी महामार्ग प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांनी आज सोमवारी जवळपास चार तास जोरदार.रस्ता रोको आंदोलन केले.
यावेळी जालना- नांदेड समृद्धी महामार्ग प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होत असून शेतकऱ्यांना पुरेसा मावेजा मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. तसेच या प्रकरणी शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे उच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत प्रशासनाने भु संपादन बाबतीत कुठलाही निर्णय घेऊ नये अशी एकंदरीत या शेतकऱ्यांचीं मागणी होती. यावेळी शेतकऱ्यांनी प्रशासनाचे प्रतिनिधी तथा तहसीलदार श्री मगर यांना निवेदन दिले.
या मध्ये असे नमूद केले होते कि,
दि 04-10-2024 रोजी जिल्हास्तरीय दरनिश्चीतीची बैठक झाली होती, त्यामध्ये समितीने सादर केल्याप्रमाणे प्रपत्र-1 ला समीतीने बैठकीमध्ये मंजुरी दिलेली आहे. दर निश्चीतीची दि 04/10/2024 रोजी प्रापत्र-1 ला मंजुरी मिळून पाच महीने झाले असून देखील आपन अद्याप पर्यंत मावेजा वाटप केलेला नाही.
. आपण केलेल्या विलंबामुळे आम्हा सर्व बाधीत शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. असे म्हटले.त्यामुळे तात्काळ 04/10/2024 च्या मंजुर प्रपत्र 1 प्रमाणे मोबदला देण्यात यावा, शासनाने गांभीर्याने दखल न घेतल्यास आम्हा शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येऊन आत्महत्या करण्याची वेळ आल्यास यास सर्वस्वी जवाबदारी शासनाची राहील असा ईशारा निवेदनात देण्यात आला..प्रशांत नाईक , रामेश्वर गाडेकर ,रमेश माने, रघुनाथ टाके, विजय खरात,पप्पु गाडेकर, सुंदर गाडेकर, निशांत मुंडे, सुनिल लिपणे सोनु खरात यांच्या सह तब्बल अडीच ते तीन तास चाललेल्या रास्ता रोको मध्ये नऊ गावचे बाधित शेतकरी आंदोलन मध्ये सहभागी होते.
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


