पालम (प्रतिनिधी) तालुक्यातील पेठ शिवणी येथील व्यापाऱ्यांनी जम्मू-काश्मीर राज्यातील पर्यटनस्थळ पहेलगाम या ठिकाणी हिंदू बांधवावर अतिरेक्यांनी बेछूट गोळ्या झाडून 27 लोकांचा जीव घेऊन काही जणांना गंभीर जखमी केले.
या घटनेची माहिती देशभरात समाज माध्यमावरून लोकांना समजली. त्यात पेठ शिवणी येथील व्यापाऱ्यांनी दिनांक 24 एप्रिल गुरुवार रोजी या घटनेच्या निषेधार्थ स्वयं स्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवली. यामुळे पेठ शिवणी बाजारपेठ कडकडीत बंद असल्याचे दिसून आले.
दरम्यान सकाळी 11 वाजता सर्व व्यापारी बांधव एकत्र येऊन अतिरेकी भ्याड हल्ल्यात मृत्यू मुखी पडलेल्या हिंदू बांधवांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध नोंदविला. पेठशिवणी बाजारपेठ बंद असल्याची माहिती समजताच पालम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश थोरात, यांनी पेठशिवनी येथे जाऊन व्यापारी बांधवांची चर्चा केली ,बंद शांततेत पाळण्यात आला.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


