परभणी ( प्रतिनिधी ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवारउद्या परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या सोबत माजी मंत्री नवाब मलिक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची उपस्थित राहणार असल्याची अशी माहिती आ राजेश विटेकर व प्रताप देशमुख यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे नांदेड येथून श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णी येथे सकाळी नऊ वाजता दर्शन साठी येणार आहेत तर त्यानंतर साडे दहा वाजता जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख यांची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत त्यानंतर महानगरपालिका कार्यालयात महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामाचा आढावा घेतील, या शासकीय कार्यक्रमानंतर दुपारी बारा वाजता अक्षता मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश होणार असल्याचे आ राजेश विटेकर व प्रताप देशमुख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी , नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, सदस्य, सरपंच, सोसायटी चेअरमन, व इतर प्रमुख नेते यांची उपस्थिती राहणार आहे सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन आ राजेश विटेकर व प्रताप देशमुख यांनी केले आहे
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


