पालम (प्रतिनिधी) शहरातील मध्यवर्ती भागात श्री स्वामी समर्थ मंदिरासमोरील रेणूकामाता निवासात कोणीच राहत नसल्याचा फायदा आज्ञात चोरट्याने घेतला दि.२७ रोजी सकाळी हि घटणाउघडकीस आली, यामध्ये दोन लाख ९९ हजाराचा ऐवज लपवास केला आहे, या प्रकारामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, या सुरू असलेल्या चोरीच्या घटना दिवसात दिवस वाढ होत आहे.
या प्रकाराकडे वरिष्ठांनी लक्ष देणे चे गरज आहे आसे नागरिकांतून बोलले जात आहे. शहरातील पालम गंगाखेड रस्त्यावरील हाकेच्या अंतरावर श्री स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर आहे, याच मंदिराच्या समोर
सहकार क्षेत्रात लेखापाल म्हणून कार्यरत असलेले महेंद्रकुमार रोहिनकर यांचे घर आहे त्यांच्या घरात कोणीच राहत नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने घराची मुख्य दरवाजा तोडून घरात प्रवेश केला व घरामधील ९० हजाराच्या अंगठ्या २७ हजाराच्या कानातले ४५ हजारातील गळ्यातली चैन २० हजाराची दागिने १२००० किमतीचे टीव्ही असा एकूण दोन लाख ९० हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आसुन त्याच रात्री शहरातील अन्य एका घरामध्ये चोरीची घटना घडली आहे याबाबत पोलीस प्रशासनाकडून माहिती मिळाली नाही.
याबाबद पोलीस प्रशासनात सतर्क नसल्याने चोराचे मनोबल दिवसान दिवस वाढत चालले आहे पालम तालुक्यात अनेक ठिकाणी छोट्या-मोठ्या चोरीच्या घटना घडूनही अद्याप एकाही घटनेचा तपास पोलीस प्रशासनाकडून झालेला नसल्याने पोलिसाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, या प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष दयावे
*श्वान पथकास पाचारण*
एकाच रात्री, एकाच परिसरात दोन ठिकाणी घरफोडी झाल्याने पोलिसांसमोरील आव्हान वाढले आहे. त्यामुळे चोरट्यांचा माग काढण्यासाठी तातडीने श्वान पथकाला बोलविण्यात आले. श्वानाने काही अंतरापर्यंत मार्ग दाखविला. हि माहिती मिळताच पालम पोलिस निरीक्षक सुरेश थोरात यांनी धटणा स्थळावर भेट देत श्वान पथक व फिगर तपासणी अधिकारी बोलावले होते.