पालम (प्रतिनिधी)) दिनांक ५ तारखेला शेतकर्यावर अस्माणी संकट कोसळले याची दखल घेऊन किसान एकता महासंघाचे प्रसाद पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी किसान एकता महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हात दिनांक ५ मे रोजी वादळी वार्यामूळे शेतकर्यांचे मोठे अर्थीक नूकसान झाले याची दखल घेऊन किसान एकता महासंघाच्या वतीने संघाचे प्रसाद पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रिय कृषि मंत्री स्वराजसिंग चव्हाण भारत सरकार नई दिल्ली यांना परभणी जिल्हयात अचानक पणे आलेल्या वादळीवारे व पाऊस यामुळे जिल्हातील शेतकऱ्याच्या केळी आंबा, संत्रा, मोसंबी या फळ पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना त्वरीत सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
सविस्तर वृत्त असे की जिल्हात दिनांक ५ मे रोजी अचानक चक्रीवादळ व अनेक ठिकानी पाऊस झाला त्या मूळे जिल्हातील शेतकर्यासह शेतमजूर न नागरिकांचे मोठे नूकसान झाले आहे. अचानक आलेल्या वादळामूळे फळ बागेचे मोठे नूकसान झाले तर काही ठिकानी नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे.अस्माणी संकटामूळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. वादळीवार्यामूळे जिल्हातील शेतकर्यांचे मोठे नूकसान झाले असून सर्व शेतकर्यांना सरसकट नूकसान भरपाईची मदत जाहिर करून अर्थीक सहकार्य करावे अशी मागणी किसान एकता महासंघाच्यावतीने करण्यात आली या नेवेदनवर किसान एकता महासंघ पालम तालुका अध्यक्ष प्रसाद पौळ व उपाध्यक्ष व्यंकटी मोरताटे यांच्या सह्या आहेत
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


