परभणी (प्रतिनिधी)आर.पी.हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट यांना ईट राईट कॅम्पस (Eat Right Campus) ने सम्मानित करण्यात आले आहे.
ईट राईट कॅम्पस हा भारतातील खाद्य सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) यांचा एक उपक्रम आहे. याचा उद्देश शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, कार्यस्थळे आणि रुग्णालये यांसारख्या कॅम्पसमध्ये सुरक्षित, निरोगी आणि शाश्वत खाद्य पद्धतींना प्रोत्साहन देणे आहे.मुख्य उद्दिष्टे: कॅम्पसमध्ये स्वच्छ आणि सुरक्षित अन्न पुरवठा सुनिश्चित करणे.निरोगी खाद्य: पौष्टिक आणि संतुलित आहाराला प्रोत्साहन देणे.शाश्वतता: पर्यावरणपूरक खाद्य पद्धतींचा अवलंबन करणे.प्रमाणन प्रक्रिया:कॅम्पसना FSSAI च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागते.FSSAI द्वारे मान्यताप्राप्त प्रशिक्षण भागीदारांमार्फत खाद्य सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणन दिले जाते.कॅम्पसच्या सुविधांचे मूल्यांकन आणि कमतरतांचे निराकरण केले जाते.अंतिम ऑडिटनंतर कॅम्पसला ‘ईट राईट कॅम्पस’ प्रमाणपत्र दिले जाते, जे कॅम्पसच्या प्रतिष्ठेला वाढवते हे प्रमाणपत्र मिळवणारे आर.पी.हॉस्पिटल महाराष्ट्रातील पहिले हॉस्पिटल ठरले आहे.
भारतातील अनेक संस्थांनी हे प्रमाणपत्र मिळवले आहे, आर.पी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट कॅम्पसना 5-स्टार रेटिंग मिळाले आहे. सदर प्रमाणपत्र हे आर.पी.हॉस्पिटलचे सर्वेसर्वा आ.डॉ.राहुल पाटील व अधिष्ठाता डॉ प्रमोद शिंदे यांना देण्यात आले.यावेळी अन्न व औषध प्रशासन परभणी चे सहायक आयुक्त (अन्न) अनंतकुमार चौधरी,अन्न सुरक्षा अधिकारी अनिकेत भिसे ,अरुण तम्मलवाड, राजश्री सावंत आदी उपस्थित होते