परभणी (प्रतिनिधी) परभणी येथील आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट च्या वतीने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी मोफत बस सेवा सुरू करण्यात आली या सेवेचा शुभारंभ आ.पाटील यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला.
बस स्थानक येथे या सेवेचा शुभारंभ झाला.यावेळी डॉ. विवेक नावंदर आर. पी. हॉस्पिटलचे डॉ. आमेर तडवी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे अनिल डहाळे अरविंद देशमुख सुभाष जोंधळे रामराव डोंगरे संभानाथ काळे,बाळराजे तळेकर विशू डहाळे मनोज पवार बंडू नाना बिडकर राहुल कांबळे अशोक गव्हाणे बाळासाहेब गोडबोले महेश पारवेकर कैलास पतंगे केदार दुधारे शिव चव्हाण अमोल कदम बबन कल्याणकर जीवन पैठणकर निखिल जैन शशी शिंदे गोविंद इक्कर प्रसाद चांदणे अजय चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ.डॉ.पाटील म्हणाले, परभणी बस स्थानक ते आर.पी. हॉस्पिटल, पाथरी रोड, परभणी या मार्गावर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दर अर्ध्या तासाला उपलब्ध असेल. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत आर.पी. हॉस्पिटल येथे जाण्यासाठी दोन बसची व्यवस्था करण्यात आली आहे.
या सेवेमुळे विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळवण्यासाठी प्रवास सुलभ होणार आहे.असे डॉ.पाटील म्हणाले
मोफत बस सेवेमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचणे सोयीचे होईल आणि त्यांचा उपचाराचा प्रवास सुखकर होईल. तसेच, मोफत तपासणी आणि परवडणाऱ्या दरातील वैद्यकीय सुविधांमुळे प्रत्येक रुग्णाला दर्जेदार उपचार मिळतील. असे याप्रसंगी सांगितले. कार्यक्रमास शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते


