परभणी (प्रतिनिधी) ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण २४ तास उभे आहोत. ज्येष्ठ नागरीक मंचच्या माध्यमातून ज्येष्ठांच्या समस्या तसेच दु:ख मी बघत आहे. शासकीय धोरणात ज्येष्ठांचे स्थान कुठे आहे याचे भान सरकारला आणून देण्यासाठीच आपण विधेयक मांडले असे प्रतिपादन आ. डॉ. राहुल पाटील यांनी केले.
ज्येष्ठांच्या अनेक अडचणींना वाचा फोडण्यासाठी विधानसभेत ज्येष्ठांच्याबाबत विधेयक मांडल्याबद्दल ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने आ. डॉ. राहुल पाटील यांचा मंगळवार, दि.२२ जुलै रोजी सत्कार करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना आ. पाटील म्हणाले, वैधानिक प्रक्रियेतून समाजातील ज्येष्ठ नागरीकांच्या समस्या सभागृहाच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे होते. त्यामुळे ज्येष्ठांचा प्रश्न आपण मनावर घेतला आणि याबाबत विधानसभेत चर्चा केली. ज्येष्ठ व्यक्तींना मानधन, औषधोपचार, विमा संरक्षण, तपासणी सुविधा या मूलभूत गोष्टी सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा प्रस्ताव मांडला. सरकारच्या अजेंड्यात वयोवृद्धांचं स्थान कुठे आहे, याचे भान त्यांना करून देणे आवश्यक होते. ज्येष्ठांच्या मागण्यांचा पाठपुरावा करून त्या मंजूर करून घेणार असल्याची ग्वाही सत्काराला उत्तर देताना आ. पाटील यांनी दिली.
यावेळी परभणी ज्येष्ठ नागरिक मंच अध्यक्ष रामराव डोंगरे, अरविंद देशमुख, दगडू अप्पा काळदाते, गंगाधर गाडगे, अशोक गव्हाणे, राधाकृष्ण पांचाळ, अंबादास चिटणीस, पंडित वाकडे, राजू शिंदे, शिवाजी मरगिळ, काशिनाथ गरुड, शिवशंकर दामोधरे, सतीश कुलकर्णी, शिवाजी जाधव, मारोती धाडवे, जगन्नाथ पवार, विलास आरमाळ, सय्यद मिस्किन, अजगर बाबामिया, केशवराव हारकळ, शेख जाफर, अब्दुल रहीब, माधव भरोसे, अंबादास डाफणे, हरिभाऊ नाईक, गंगाधर नवघरे, सुभाष व्यवहारे, जगन्नाथ चोपडे, अशोक देशमुख, लक्ष्मण पवार, बालासाहेब गायकवाड, प्रल्हाद गायकवाड, सूर्यवंशी, तिडके, डीगांबर चट्टे, वैजनाथ आहेर, मुंजाजी घाडगे, उत्तमराव हेंडगे, काशिनाथ आहेर, भगवान पांचाळ, सूर्यकांत मंडळे, दशरथ ईबतवार, शामराव इंगळे, बालासाहेब शेरे, भीमराव पतंगे, शेख मकसूद अहमद, संभाजी दालपुसे आदीसह ज्येष्ठ नागरीक मंचचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


