परभणी (प्रतिनिधी) विद्यार्थी दशेत मुलांनी मोठे ध्येय प्राप्त करण्याचे स्वप्न बाळगून प्रामाणिकपणे अभ्यास करणे आवश्यक आहे मनापासून ठरवलेले ध्येय प्राप्त करण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध असून तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावरच ध्येयप्राप्ती शक्य आहे असे प्रतिपादन बालविकास शास्त्रज्ञ प्रा.विशाला पटनम यांनी वसंत आश्रम शाळा कारेगाव येथे आयोजित बाल विकास कार्यशाळेत केले..
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापिका गीता लेडे, प्रमुख अतिथी मुख्याध्यापक परसराम जाधव, उपस्थित होते.. प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून प्रा पटनम यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासंदर्भात मोलाचे असे मार्गदर्शन केले.. विद्यार्थ्यांचा iq लेवल टेस्ट करण्याची प्रात्यक्षिक घेण्यात आली. त्यावेळी विष्णू मोपकर,संजय इंगळे, श्रीकांत काळे l, प्रकाश राठोड,अंबादास रेडेवाड,सुनील कच्छवे, राजेंद्र जुनघरे, मोतीराम कराळे, विश्वनाथ खिराडे, उपस्थित होते… सूत्रसंचालन गजानन मुडे यांनी तर आभार प्रदर्शन राम गारकर यांनी केले


