परभणी (प्रतिनिधी) :राजे संभाजी मित्र मंडळ आयोजित भव्य 23 वा दहीहंडी महोत्सव व 23वी माखनचोर दहीहंडी फोड स्पर्धा या दोन्ही कार्यक्रमांच्या स्टेज व तयारीचे भूमिपूजन दि. १६ रोजी येथील महात्मा फुले विद्यालय, जिंतूर रोडवरील मैदानावर उत्साहात संपन्न झाले.
हा भव्य सोहळा राजे संभाजी मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष, लोकप्रिय खासदार संजय भाऊ (बंडू) जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत असून, परभणीकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
भूमिपूजनाचा शुभारंभ परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले पाटील, संचालक सोपानराव मोरे, रावसाहेब रेंगे, तसेच रमेश भाऊ दळवी व अजय गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी अजयराव गव्हाणे, सचिन मोटे, संतोष कांबळे, शितल साकला, रामप्रसाद रणेर, दिलीप पवार, सचिन जोगदंड, प्रल्हादराव लाड, सचिन राष्ट्रकूट, देविदास राव खटिंग, पवन आगलावे, कुणाल गायकवाड, गजानन लव्हाळे, प्रदीप भालेराव, संतोष सामाले आदी मान्यवरांसह राजे संभाजी मित्र मंडळाचे सर्व सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दहीहंडी सोहळ्यासाठी परभणी शहरासह परिसरातील अनेक दहीहंडी पथके उत्साहाने सहभागी होणार असून, स्पर्धेमध्ये प्रेक्षकांना थरारक वातावरणाचा अनुभव मिळणार आहे.
यावर्षीच्या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे लोकप्रिय सिनेअभिनेत्री अमृता खानविलकर यांची उपस्थिती राहणार असून, त्यांच्यामुळे कार्यक्रमाला विशेष बहार येणार आहे.
हा भव्य दहीहंडी महोत्सव व माखनचोर दहीहंडी फोड स्पर्धा दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता, महात्मा फुले विद्यालय मैदान, जिंतूर रोड, परभणी येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सर्व सदस्य अहोरात्र परिश्रम घेत असून, परभणीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जल्लोषाचा आनंद घ्यावा, असे आवाहन राजे संभाजी मित्र मंडळ व संस्थापक अध्यक्ष खासदार संजय भाऊ जाधव यांनी केले आहे.


