परभणी( प्रतिनिधी) 5 सप्टेंबर 2025 रोजी बाल विद्यामंदिर हायस्कूल वैभव नगर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वैभव नगर विभागाचे विभाग प्रमुख प्रदीप रुघे सर उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेतील विज्ञान शिक्षक सचिन वानरे उपस्थित होते. शिक्षक दिनानिमित्त वर्ग सहावा जी च्या वर्गशिक्षिका सौ आर. एस. देशमुख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुंदर भितीपत्रके तयार केले. तसेच भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन व सावित्रीबाई फुले यांची सुंदर चित्रे रेखाटले. वर्गातील चि. ओजस उखळकर ची श्रेयस राऊत ची अन्वय अवचार खूप प्रचिती चांडक शरयू जाधव कु. आदिती जाधव तसेच आरोही खंदारे यांनी आपल्या भाषणातून शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्व व शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कु. शाल्वी डावरे, अजिंक्य तारडे, समर्थ वाघमारे, समीर चव्हाण,अथर्व भुसारे या विद्यार्थ्यांनी सुंदर चित्र रेखाटन केले. तसेच चि. ऋतुराज वाघ,शिशिर शिंदे, व्यंकटेश घुगे, शुभम शेळके, अरिहंत काळे सर्वेश कोठेकर, कु. धनश्री कनकुटे, स्वरा मुळे, सुखदा जोशी,श्रुती पांचाळ, प्रज्ञा देशपांडे, सिद्धी कुटे, सिद्धी मस्के, श्रीनिधी रोकडे, श्वेता काळे, श्रावणी रोकडे, अवनी कोकडवार, सृष्टी गरुड, तेजस्वी चव्हाण इत्यादी विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर आधारित सुंदर भीतीपत्रके तयार केले. कु. आरुषी पद्मे व कु. श्रेया साळापुरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर कु.मनस्वी कारेगावकर हिने आभार मानले.याप्रसंगी प्रशालेतील सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्व शिक्षक वृंदांचा वर्ग सहावा जी च्या वतीने पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन व अध्यक्ष यांच्या भाषणाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
🙏🌹💐


