परभणी (प्रतिनिधी) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक प्रा धुंडीराज उर्फ आबासाहेब नागोराव देशपांडे यांचे आज शनिवार रोजी पहाटे निधन झाले. मृत्यूसमयी ते 81 वर्षांचे होत.
प्रा.देशपांडे हे श्री शिवाजी महाविद्यालयातून विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तेथून ते सेवानिवृत्त झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते लहानपणापासून स्वयंसेवक होते. जिल्हा कार्यवाह, विभागीय कार्यवाह म्हणून देशपांडे यांनी दायित्व सांभाळले होते. आणीबाणीच्या काळात ते नाशिक येथील कारागृहात 18 महिने बंदिस्त होते. संघ परिवारातील सहकार भारती या संघटनेचे ते क्षेत्रीय संघटनमंत्री म्हणून कार्यरत होते. सहकार क्षेत्रातील नामवंत जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थाचे ते संस्थापक सदस्य, अध्यक्ष होते.
अतिशय शांत, संयमी, मृदु भाषी असं व्यक्तिमत्व असणारे प्रा देशपांडे हे संघ परिवारात आबासाहेब म्हणून सर्व दूर परिचित होते.
दरम्यान प्रा. देशपांडे यांच्या पश्चात एक मुलगा ,दोन मुली, सून जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे. दैनिक लोकसंचार परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


