परभणी (प्रतिनिधी) – राष्ट्रीय एकता दिवस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी परभणी महानगर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात पालकमंत्री मा.ना.सौ. मेघनादीदी बोर्डीकर, मा. मंत्री सुरेशराव वरपूडकर, भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष. शिवाजीराव भरोसे, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष. सुरेश भुमरे, डॉ. केदार खटिंग आणि सौ. प्रेरणाताई वरपूडकर यांच्या हस्ते गोमाता पूजनाने करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते “रन फॉर युनिटी” या पदयात्रेला प्रारंभ झाला.
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून निघालेल्या या यात्रेचा समारोप गांधी पार्क येथे झाला. या पदयात्रेत हजारो परभणीकरांनी उत्साहाने सहभाग घेत, राष्ट्रीय एकता, अखंडता आणि देशभक्तीचा संदेश दिला.
या वेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिलांचाही लक्षणीय सहभाग होता. विविध शासकीय अधिकारी, सामाजिक संस्था, विद्यार्थी, स्वयंसेवक आणि नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.


