परभणी ( प्रतिनिधी) शिवसेना महिला आघाडी सातत्याने महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करते. केवळ प्रश्नच नाही तर त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पुढाकार घेत आहे. परभणीत महिलांसाठी सुरू केलेले महिला जिल्हा संपर्क कार्यालय निश्चितच महिलांच्या हक्काचे, चळवळीचे केंद्र बनेल, असे प्रतिपादन शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या तथा शिवसेना महिला आघाडी मराठवाडा समन्वयक ज्योती ठाकरे यांनी केले.
शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख अंबिका डहाळे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन रविवार, दि.९ रोजी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माजी अध्यक्ष तथा शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील, डॉ. संप्रीया पाटील, मुंब्रा महिला आघाडी शहर प्रमुख डॉ.शाहीन,डॉ.विवेक नावंदर,अंबिका डहाळे, संजय गाडगे, सुर्यकांत हाके, संग्राम जामकर, अनिल डहाळे, ज्ञानेश्वर पवार, प्रशास ठाकूर, नवनीत पाचपोर, घनशाम मालपाणी, विशू डहाळे, उत्तम मुळे, बंडू बीडकर, महेश येरळकर आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना ज्योती ठाकरे म्हणाल्या, शिवसेना महिला आघाडीसह आ. डॉ.राहुल पाटील यांच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी मोठे कार्य सुरू आहे. त्यांनी महिलांना थेट रोजगार, प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला. त्यांच्या उपक्रमाचे शासन देखील काही प्रमाणात अनुकरण करत आहे असे सांगितले.
यावेळी बोलताना आ.डॉ.पाटील म्हणाले,आम्ही सातत्याने महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत आहोत. महिला सक्षम झाल्या पाहिजेत, त्या स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. महिलांची स्वत:ची बँक असावी म्हणून आम्ही पतसंस्था देखील उभारली आहे. त्या माध्यमातून महिलांना सक्षम केले जात आहे. त्यांना रोजगारासाठी आर्थिक मदत केली जात आहे.त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे.महिलांच्या प्रत्येक अडचणींच्या प्रसंगी शिवसेना महिला आघाडी मदतीसाठी धावून जाते. शिवसेना महिला आघाडीच्या पाठींब्यामुळे महिलांना भक्कम आधार मिळाला असल्याचे आ.डॉ.पाटील म्हणाले.
सुत्रसंचालन प्रल्हाद देवडे यांनी तर आभार अंबिका डहाळे यांनी मानले. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या वंदना कदम, द्रोपदी जावळे, कविता नांदुरे, संगीता टेहरे, उषा मुंडे, अंजली पवार, संगीता चट्टे, मीरा कवाळे, सविता तावडे, संतोषी देवके, दिपा बोरूळ, मंदा वाघमारे आदिंसह महिला आघाडी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


