परभणी, (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी जिल्हा कारागृहात मानवी हक्क व संरक्षणाबाबत जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव भुषण काळे, जिल्हा कारागृह अधीक्षक राजेंद्र मरळे, तुरुंगाधिकारी श्रेणी-2 श्रीमती स्वाती जाधवर, तसेच अॅड. लायबा बेग आणि अॅड. वामन वाघमारे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कारागृहातील अधिकारी व कर्मचारी – सर्यकांत सोनसळे, शिवाजी जोगदंड, प्रमोद तारे, जुनेद शेख, गजानन बेले, साईनाथ अंधारे, आरती खाडे, अक्षय थाटकर, वर्षा खंदारे, नामदेव पोले, जुनेद लताफ खान, कपिल नरंगळे, किरण माने, नारायण घुले, सचिन कोरके, विश्वास गाडे, गोपाळ सुरकुटलावार व बालाजी अमृतवार यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी बंद्यांच्या मूलभूत मानवी हक्कांचे संरक्षण याबाबत मार्गदर्शन केले.
*-*-*-*-*


