परभणी (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीने परभणी शहर महानगरपालिका निवडणूक–2025 च्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. या मुलाखती पालकमंत्री मा.ना. सौ. मेघनादीदी बोर्डीकर, मराठवाडा संघटनमंत्री श्री. संजयजी कौडगे, निवडणूक प्रमुख मा.आ. श्री. सुरेशराव वरपूडकर, ज्येष्ठ नेते मा.आ. श्री. रामप्रसादजी बोर्डीकर, भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजीराव भरोसे, डॉ. केदार खटिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहेत.
परभणी शहरातील सर्व इच्छुक उमेदवारांनी दिनांक १४ डिसेंबर २०२५ (रविवार) रोजी सकाळी १०.०० वाजता, भारतीय जनता पार्टी मध्यवर्ती संपर्क कार्यालय, संजीवनी पेट्रोल पंपाच्या बाजूला, वसमत रोड, परभणी येथे उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजीराव भरोसे यांनी केले आहे.


