परभणी (प्रतिनिधी) यशस्वीनी महिला मंचच्या वतीने महिला बचत गट व महिला गृह उद्योजिका यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शन शहरातील वसमत रस्त्यावरील जागृती मंगल कार्यालय येथे दिनांक २ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.अशी माहीती मंचच्या अध्यक्षा डॉ. संप्रिया पाटील यांनी दिली.
यशस्वीनी महिला मंचच्यावतीने महिलांसाठी विविध क्षेत्रातील कार्यक्रम आयोजीत करण्यात येत असतात. मागील काही वर्षापासून महिलांना रोजगार मिळावा या उद्देशाने हे प्रदर्शन भरवले जात आहे. यंदाचे हे प्रदर्शन दिनांक २ जानेवारी रोजी सुरु होत आहे. दिनांक ४ जानेवारी पर्यंत जागृती मंगल कार्यालयात आयोजित प्रदर्शनात महिला बचत गट व महिला गृह उद्योजिका यांनी उत्पादीत केलेल्या विविध प्रकारचे मसाले, कुरुड्या विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, गृह शोभेच्या वस्तू व अन्य गृहपयोगी वस्तू यांचे स्टॉल असणार आहेत.आपल्या माणसांनी आपल्या माणसांसाठी तयार केलेल्या वस्तु,खाद्यप्रदार्थ यांना योग्य दर मिळावा आणि थेट उद्योजक ते ग्राहक हे नात जुळाव यासाठी हे प्रदर्शन भरवले जात आहे. या ठिकाणी महिलांसह नागरीकांनी भेट देवून या महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तू विक्री व प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन यशस्विनी महिला महिला मंचच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. संप्रीया पाटील यांनी केले आहे.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


