परभणी,(प्रतिनिधी) : परभणी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या व छाननी प्रक्रियेतून वैध ठरलेल्या एकूण उमेदवारांपैकी शुक्रवार 2 जानेवारी रोजी अर्ज माघारीच्या अंतीम मुदतीत प्रभाग क्रमांक 10 मधून 9, प्रभाग क्रमांक 11 मधून 4, व प्रभाग क्रमांक 13 मधून 7 अशा एकूण 20 उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली.
प्रभाग क्रमांक 10 अ अनुसूचित जाती महिला गटातून नंदा गौतम मुंढे व दिक्षा सतीश भिसे, प्रभाग क्रमांक 10 क सर्वसाधारण गटातून गणेश जाधव, वर्षा विजय लव्हाळे, शेख अझरोद्दीन आझम, शेख हबीब शेख रफीक, प्रभाग 10 ड सर्वसाधारण गटातून सय्यद मुजीबऊर रहेमान, सय्यद शमशुल इसलाम हाशमी व विश्वास प्रल्हादराव कर्हाळे, प्रभाग क्रमांक 11 अ नागरीकांचा मागास प्रवर्गातून अन्सारी मोहम्मद नवीन मोहम्मद सईदोद्दीन, शेख सनोबर तहेसीन मोहम्मद शकील, सय्यद मोईन सय्यद हसन, प्रभाग क्रमांक 11 ड सर्वसाधारण प्रवर्गातून मिर्झा जाहीद बेग खलील बेग, प्रभाग क्रमांक 13 अ अनुसूचित जाती प्रवर्गातून वसंत किसनराव लामतुरे, लक्ष्मण चव्हाण, प्रभाग क्रमांक 13 ब नागरीकांचा मागास प्रवर्गातून अहिल्या सचिन भोजने, प्रभाग क्रमांक 13 क सर्वसाधारण महिला प्रवर्गातून अस्मिता प्रमोद अंधारे, समरीन फातेमा खाजा खान, प्रभाग क्रमांक 13 ड सर्वसाधारण प्रवर्गातून अरबाज खान व रहेमान खान जावेद खान या उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली.
Sunday, February 8
ताज्या बातम्या:
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांना सर्व पत्रकारातर्फे श्रद्धांजली अर्पण
- संत श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रम; आत्मोन्नती प्रतिष्ठानचा उपक्रम
- शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून प्रदर्शनाची तयारी करा- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे
- मारोतराव लोमटे यांचे निधन
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांची उद्या परभणीत शोकसभा
- यशस्वीतेसाठी कठोर परिश्रम आवश्यक- सर्वेश काबरा
- जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी
- केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी;, पायाभूत सुविधा व ऊर्जेला नवी दिशा — राज्यमंत्री मेघना बोर्डीकर


