परभणी ( प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांची जाहीर सभा संपन्न झाली. या सभेस. प्रतापभैय्या देशमुख ( शहरजिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परभणी ) यांनी उपस्थित राहुन मतदारांशी संवाद साधल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेने समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पुढे जाणारा पक्ष आहे. परभणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रभागातील पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येणाऱ्या 15 जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या “घड्याळ” या चिन्हासमोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी आ. राजेशदादा विटेकर, आमदार राजू भैय्या नवघरे,परभणी निरीक्षक मधुकर राजे अर्दड साहेब, प्रदेश प्रवक्ते श्री. सूरज चव्हाण यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार, नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते आणि मतदार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


