परभणी (प्रतिनिधी) परभणी शहर महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या गटनेता पदासाठी आज विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे अधिकृतरित्या निवड प्रक्रिया पार पडली.
या प्रक्रियेत सर्व नगरसेवकांच्या एकमताने श्रीमती तिरुमला मुकुंद खिल्लारे यांची भाजपा गटनेता म्हणून निवड करण्यात आली.
मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष मा.आ. श्री. रवींद्रजी चव्हाण, पालकमंत्री मा.ना. सौ. मेघनादीदी बोर्डीकर, संघटनमंत्री श्री.संजय कौडगे यांच्या सूचनेनुसार तसेच निवडणूक प्रमुख श्री. सुरेशराव वरपूडकर व श्री. रामप्रसाद बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली.
यापूर्वी दिनांक २२ जानेवारी रोजी परभणी महानगर कार्यालयात बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीचे अध्यक्षस्थान भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजी भरोसे यांनी भूषविले. निवडीचा प्रस्ताव सूचक म्हणून डॉ. केदार लक्ष्मणराव खटिंग यांनी मांडला तर प्रस्तावास श्री. रितेश कांतीलाल झांबड (जैन) यांनी अनुमोदन दिले.
या अधिकृत निवडीबद्दल सर्व नगरसेवकांनी श्रीमती तिरुमला मुकुंद खिल्लारे यांचे अभिनंदन केले.
भाजपा नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली परभणी महानगरपालिकेत विकासाभिमुख व लोकहिताचे निर्णय घेतले जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजी भरोसे यांच्यासह सौ. तिरुमला मुकुंद खिल्लारे, सौ. वैशाली दत्तात्रय दैठणकर, सौ. सपना व्यंकटेश जुकटे, श्री. विश्वजीत बुधवंत, श्री. गणेश टाक, श्री. रितेश जैन, सौ. गिरीजा शंकर आजेगावकर, सौ. मीना सुरेशराव वरपूडकर, सौ. निर्मला बालासाहेब वाघमारे, सौ. सुशीला जिजाजी थोरात, श्री. अद्वैत सांगळे तसेच डॉ. केदार खटिंग हे नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.


