परभणी ( प्रतिनिधी ) शहरातील ऐतिहासिक दर्गाह हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क रहे यांच्या वार्षिक उर्स निमित्ताने महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत तात्पुरत्या उर्स समितीची नियुक्ती केली आहे.
या समितीच्या अध्यक्षपदी श्री. शिवाजी शेषरावजी भरोसे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली उर्स काळात भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा व नियोजनबद्ध व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
उर्सचा कालावधी दि. 07 फेब्रुवारी 2026 ते दि. 15 फेब्रुवारी 2026 असा राहणार आहे.
समितीतील प्रमुख पदाधिकारी अध्यक्ष. शिवाजी शेषरावजी भरोसे, उपाध्यक्ष शेख निहाल नूर मोहम्मद समितीमध्ये सामाजिक, धार्मिक व विविध क्षेत्रातील प्रविण गायकवाड, कादरी मोहम्मद मिन्हाजोद्दीन, भालचंद्र गोरे, जावेद खान अन्सार खान पठाण, मोहम्मद कलिमोद्दीन मोहम्मद मोईनोद्दीन, रामेश्वर अवचार, मुकींद खिल्लारे, सय्यद खेसर अली, शंकर ओगेगावकर, मोहम्मद गौस मोहम्मद हनीफ, अब्दुल छोटे मिया, विजय गायकवाड, अर्जुन गोंडवार, शेख आरिफ शेख साबेर, हामु चाऊस या मान्यवर सदस्यांचा समावेश करण्यात आला असून उर्स शांततेत व सुव्यवस्थितपणे पार पडावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.
शिवाजी भरोसे यांची अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे परभणी शहरात समाधान व्यक्त होत असून, उर्सच्या माध्यमातून धार्मिक सलोखा व सामाजिक एकतेचा संदेश अधिक दृढ होणार असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.


